रस्त्यावर दूषित पाणी; नागरिक त्रस्त

रस्त्यावर दूषित पाणी; नागरिक त्रस्त
Published on

रस्त्यावर दूषित पाणी आल्याने नागरिक त्रस्त

बोईसर, ता. ८ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील टी-झोन परिसरात लुपिन कंपनीसमोरील चेंबर तुंबल्याने येथील रस्त्यावर चक्क रासायनिकयुक्त दूषित पाणी बाहेर आल्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या प्रकारामुळे परिसरातील कामगार, वाहनचालक व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन लागला.

सध्या येथील परिसरात गटार व रस्त्यांचे काम सुरू असतानाच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात रासायनिक पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण दूषित होत असून, आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून दररोज अवजड वाहनांची वाहतूक तसेच हजारो कामगारांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत रस्त्यावर साचलेल्या रासायनिक पाण्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गटार व चेंबर व्यवस्थेची नियमित देखभाल होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच दूषित पाणी बाहेर पडत असल्याने संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून चेंबरची साफसफाई, रासायनिक पाण्याचा निचरा आणि प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com