आरसीएफ शिक्षकांच्या प्रश्नावर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

आरसीएफ शिक्षकांच्या प्रश्नावर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
Published on

आरसीएफ शिक्षकांच्या प्रश्नावर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
दोन वर्षांपासून वेतन थकीत; सकारात्मक चर्चा

अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) : गेल्या दोन वर्षांपासून वेतनाविना काम करणाऱ्या आरसीएफ शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नावर अखेर मंत्रालय स्तरावर हालचाल सुरू झाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.
दोन वर्षांपासून वेतन रखडल्यामुळे शिक्षक गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. काही शिक्षकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
बैठकीत शाळेचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. आमदार महेंद्र दळवी यांनी या प्रश्नासाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, शिक्षकांचे थकीत वेतन मंजूर करण्याबाबतही चर्चा झाली. या घडामोडींमुळे आरसीएफ शाळेचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची आशा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com