मिरा भाईंदरमध्ये ९७.५५ टक्के निकाल

मिरा भाईंदरमध्ये ९७.५५ टक्के निकाल
Published on

६७ शाळांचा १०० टक्के निकाल
भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील ६७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यंदा विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांपेक्षा अधिक असून दहावीचा निकाल ९७.५५ टक्के लागला आहे.
शहरातील १५३ शाळांमधील १०,२१९ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५,१३४ विद्यार्थी, ४,८३५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थिनींची टक्केवारी ९८.३५ आहे. तर विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.८१ आहे. विशेष श्रेणीत ४,३१०, प्रथम वर्गात ३,२१७, द्वितीय वर्गात १,८०६, पास श्रेणीत ६३६ परीक्षार्थी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com