

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान ४९ जणांना जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे लाचखोरांचे अर्धशतक अवघ्या एका अंकाने हुकले असून मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांची संख्या सहाने वाढली आहे. या कारवाईत महसूल आणि पोलिस हे दोन विभाग आघाडीवर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ‘एसीबी’च्या वाढत्या कारवायांमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे आणि नवी मुंबई असे दोन स्वतंत्र विभाग असून एकूण सात विभाग कार्यरत आहेत. या विभागांमार्फत सरकारच्या सुमारे ४२ विभागांविरोधातील तक्रारींची पडताळणी करून कारवाई केली जाते. या
आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये एकूण ३३ गुन्हे दाखल झाले होते. यंदा ही संख्या वाढून ३९ वर पोहोचली आहे. ठाणे विभागात १८ वरून १६ अशी घट झाली असली तरी नवी मुंबईत तीनवरून सहा, रायगडमध्ये पाच वरून सहा, रत्नागिरीत दोनवरून चार आणि सिंधुदुर्गमध्ये एकवरून तीन गुन्ह्यांपर्यंत वाढ झाली आहे. पालघरमध्ये गुन्ह्यांची संख्या चारवर स्थिर राहिली. अटक झालेल्या ४९ जणांमध्ये ३१ ते ५० वयोगटातील सर्वाधिक ३२ जणांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील एकाही व्यक्तीवर कारवाई न झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.
गुन्हे दाखल
२०२५ ३३
२०२६ ३९
जानेवारी ते एप्रिलदरम्यान गुन्हे
२०२५ २०२६
ठाणे १८ १६
नवी मुंबई ३ ६
रायगड ५ ६
रत्नागिरी २ ४
सिंधुदुर्ग १ ३
पालघर ४ ४
अटकेची कारवाई
वयोगट लोकसेवक खासगी व्यक्ती
२० ते ३० ५ ०
३१ ते ५० २७ ५
५१ ते ६० ९ ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.