लघुलेखकांच्या बदलीत अनियमितता

लघुलेखकांच्या बदलीत अनियमितता
Published on

लघुलेखकांच्या बदलीत अनियमितता?
नवी मुंबई महापालिकेत बदली आदेशांना केराची टोपली
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई पालिकेत लघुलेखक (स्टेनोग्राफर) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतर सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार व वेळेवर होत असताना, लघुलेखक संवर्गातील अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, बदलीचे आदेश निघाल्यानंतरही काही कर्मचारी नव्या ठिकाणी रुजू न होता विविध मार्गांनी वशिला किंवा आर्थिक प्रभावाने बदली रद्द करून पुन्हा त्याच विभागात कार्यरत राहतात. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होत आहेत. लघुलेखक संवर्गाचे मूळ काम म्हणजे विविध बैठकींचे इतिवृत्त (मिनिट्स) तयार करणे. मात्र, प्रत्यक्षात अनेक लघुलेखक इतर विभागांत ‘आवक-जावक’ सारखी लिपिकीय कामे करत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, ज्या विभागात त्यांच्या कौशल्याची खरी गरज आहे, तिथे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, ज्या विभागात ज्या पदांची गरज आहे, तिथे तातडीने पदस्थापना करून कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष न दिल्यास, महत्त्वाच्या शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता तरी महापालिका प्रशासन जागे होणार का, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित होत आहे.

सचिव विभागावर कामकाजाचा डोंगर
१ नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर महासभा, स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती आदी विविध बैठकींचे इतिवृत्त तयार करण्याचे काम वाढले आहे, परंतु सचिव विभागात वरिष्ठ लघुलेखकांची कमतरता असल्यामुळे हे काम कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर टाकले जात असून, त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
२ शासनाच्या २१ ऑगस्ट २०१७ च्या निर्णयानुसार सचिव विभागासाठी उच्च श्रेणीतील एक आणि निम्न श्रेणीतील पाच असे एकूण सहा लघुलेखक पदे मंजूर आहेत. तरीही प्रत्यक्षात हे कर्मचारी इतर विभागात कार्यरत असल्याने सचिव विभागाचे कामकाज अडचणीत आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com