उलवेतील हत्याकांडाचा आरोपीला जन्मठेप

उलवेतील हत्याकांडाचा आरोपीला जन्मठेप
Published on

पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : उलवे येथे एका वृद्ध व्यक्तीची हत्या करून त्यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि घरातील ऐवज लुटणाऱ्या संदीप गुप्ता याला पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. आर. उगले यांनी गुरुवारी (ता. ७) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेसह ५० हजार रुपये दंड आणि विविध कलमान्वये दोनवेळा सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

रामप्रसाद गुप्ता आणि त्यांची पत्नी लक्ष्मीदेवी हे उलवे सेक्टर-२३ मधील एका इमारतीत राहत होते. संदीप हा रामप्रसाद यांच्या सुनेचा भाऊ आहे. त्याने रामप्रसादकडून ७० हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे रामप्रसाद परत मागत असल्याने, त्याचा राग मनात धरून चोरीच्या उद्देशाने २२ एप्रिल २०१८ रोजी संदीप त्यांच्या घरी गेला होता. लक्ष्मीदेवी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असताना, संदीपने रामप्रसाद यांना बेडरूममध्ये नेऊन चाकूने वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने लक्ष्मीदेवी यांच्या गळ्यावरही वार करून त्यांना बाथरूममध्ये फेकले होते. त्यानंतर त्याने कपाटातील नऊ तोळे सोने व ८० हजारांची रोकड घेऊन पलायन केले होते.

या घटनेत जखमी झालेल्या लक्ष्मीदेवी यांनी इमारतीखाली येऊन एका साक्षीदारासमोर ‘सतीश के साले ने मेरे पती को मारा’ असे लिहून आरोपीची ओळख पटवून दिली होती. सतर्क नागरिकांमुळे त्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर एन. आर. आय पोलिसांनी संदीपवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com