‘शिवसेने’च्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘शिवसेने’च्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

बदलापूर, ता. ८ (बातमीदार) : शहरातील बेरोजगार युवक-युवतींसाठी आशेचा किरण ठरलेला भव्य रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवसेना बदलापूर शहर तसेच नगरसेवक ॲड. संदेश ढमढेरे आणि नगरसेविका सोनिया ढमढेरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार शिबिराला युवक-युवतींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नामांकित ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी घेण्यात आलेल्या या मेगा भरती प्रक्रियेत बदलापूरसह परिसरातील शेकडो उमेदवारांनी सहभाग घेतला. सकाळपासूनच मुलाखतींसाठी युवक-युवतींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध टप्प्यांमधून पार पडलेल्या निवड प्रक्रियेनंतर १०० हून अधिक बेरोजगार युवक-युवतींना थेट रोजगाराची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि नव्या आशांचा प्रकाश निर्माण झाला आहे.

या रोजगार मेळाव्यामुळे शहरातील तरुणाईमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ‘अशा प्रकारचे रोजगार शिबिर शहरात सातत्याने आयोजित झाले पाहिजेत,’ अशा प्रतिक्रिया सहभागी युवक-युवतींनी व्यक्त केल्या. ‘मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने आमच्यासाठी करिअरची नवी दारे खुली झाली आहेत,’ असे मत अनेकांनी मांडले. विशेष म्हणजे, संपूर्ण भरती प्रक्रिया कोणतेही शुल्क न आकारता पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. बदलापूर शहरातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर तसेच नगरसेवक संदेश ढमढेरे आणि नगरसेविका सोनिया ढमढेरे यांनी राबविलेला हा उपक्रम अनेक गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक ठरल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com