

एपीएमसीत स्वच्छतेवर भर
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची पाहणी; कचरा व्यवस्थापन व नालेसफाईबाबत कडक सूचना
नेरूळ, ता. ८ (वार्ताहर) : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये अंतर्गत स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी प्रशासनासोबत संयुक्त पाहणी करताना त्यांनी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत काटेकोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
या पाहणीत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, उपआयुक्त सोमनाथ पोटरे, डॉ. अजय गडदे, स्मिता काळे, डॉ. राजेश म्हात्रे तसेच एपीएमसीचे अधिकारी उपस्थित होते. बाजारात दररोज मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जड वाहनांमुळे स्वच्छतेत अडथळे येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहनांच्या वेळांचे नियोजन करून कचरा संकलनाची कार्यवाही सुटसुटीत करण्याचे आदेश देण्यात आले.
भाजीपाला व फळांचा नाशवंत कचरा मोठ्या प्रमाणात साचत असल्याने त्याचे त्वरित संकलन करण्यावर भर देण्यात आला. तसेच पॅकेजिंगमधील तूस भिजून कुजत असल्याने दुर्गंधी पसरते, यावर उपाय म्हणून नियमित साफसफाई वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. नालेसफाई वेगाने करून त्यासाठी सक्शन पंपाचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला.
पावसाळ्यात फळ मार्केटजवळ पाणी साचण्याच्या समस्येची पाहणी करून नाल्यांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बंद गटार स्वच्छ ठेवून कचरा अडकणार नाही याची खबरदारी घेण्याचेही सांगण्यात आले.
चौकट
कचरा व्यवस्थापन सुधारणा :
बाजारात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने त्याचे वारंवार संकलन करणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करून वाहन वाहतुकीशी समन्वय साधणे गरजेचे आहे.
बॉक्स
पाणी साचण्यावर उपाययोजना :
मार्केट परिसरातील जलनिस्सारण सुधारण्यासाठी नाले रुंदीकरण, साफसफाई आणि अतिरिक्त पंप बसविणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या टाळता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.