

कोपरखैरणेत आरोग्य सुविधांचा अभाव
स्थानिक पातळीवर लॅब सुरू करण्याची मागणी
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील प्रभाग क्रमांक १२ मधील सेक्टर १४ व १६ मधील नागरिकांना रक्त तपासणीसाठी बोनकोडे येथील आरोग्य केंद्रात जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. स्थानिक नगरसेविका दीक्षा कचरे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत स्थानिक नागरी आरोग्य केंद्रातच रक्त तपासणी लॅब सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
दररोज ४० ते ५० नागरिक उपचारासाठी येत असतानाही या केंद्रात तपासणी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला व लहान मुलांना विशेष त्रास सहन करावा लागतो. तीन मजली इमारत असूनही लिफ्ट नसल्यानेही अडचणी वाढल्या आहेत. लॅबसाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्याचे नमूद करत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.