वडाळे तलावातील जलपर्णी निर्मूलन मोहीम सुरू

वडाळे तलावातील जलपर्णी निर्मूलन मोहीम सुरू
Published on

वडाळे तलावातील जलपर्णी निर्मूलन मोहीम सुरू
जैविक कीटकांच्या मदतीने पर्यावरणपूरक उपाय; वर्षभरात तलाव स्वच्छ होण्याची शक्यता

कामोठे, ता. १० (बातमीदार) : पनवेल येथील ऐतिहासिक वडाळे तलाव जलपर्णीमुक्त करण्यासाठी जैविक नियंत्रण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. इंडियन काउंसिल फॉर ॲग्रीकल्चरल रिसर्चच्या सहकार्याने जबलपूर येथील संशोधकांनी ‘साल्व्हिनिया विविल’ या भुंग्यांच्या प्रजातीतील कीटकांचे तलावात विसर्जन केले. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला. या कीटकांमुळे तलावातील जीवसृष्टीला कोणताही धोका नसून ते केवळ जलपर्णीवर उपजीविका करतात. त्यामुळे पुढील वर्षभरात जलपर्णी हळूहळू नष्ट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या तंत्रज्ञानाचा वापर मध्य प्रदेशातील अनेक तलावांमध्ये यशस्वी ठरला आहे.
तलावातील जलपर्णीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जैवविविधतेवर परिणाम होत होता. तसेच डासांची वाढ होऊन आरोग्यविषयक समस्या निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.


जैविक नियंत्रण पद्धतीचे महत्त्व
‘साल्व्हिनिया विविल’ हे कीटक जलपर्णीच्या पानांवरच उपजीविका करतात, त्यामुळे इतर जलचरांवर कोणताही परिणाम होत नाही. ही पद्धत कमी खर्चिक, पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन परिणाम देणारी असल्याने तलाव संवर्धनासाठी प्रभावी उपाय मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com