

अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, अंबरनाथमधील विविध शाळांनी यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. शहरातील शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय, भाऊसाहेब परांजपे विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय तसेच श्रीमती सुहासिनी प्रभाकर अधिकारी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे.
शिवाजी आबाजी कोळकर विद्यालयात तेजल प्रवीण पाटील हिने ९५ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. भक्ती अजय ठाणेकर हिने ९३.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर रुद्र प्रकाश परब याने ९०.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
दि एज्युकेशन सोसायटी संचालित भाऊसाहेब परांजपे विद्यालयाचा निकाल ९४.८७ टक्के लागला आहे. या विद्यालयात वरद संतोष चव्हाण याने ९७.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य अभय खोंड याने ९५.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर दिक्षा प्रवीण धेंडे हिने ९१.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. विद्यालयातील ७७ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
भगिनी मंडळ संचलित श्रीमती सुहासिनी प्रभाकर अधिकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९१.९१ टक्के लागला आहे. वरद विष्णू प्रसाद घोसाळकर याने ९४.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. समीक्षा विद्याधर खेडेकर हिने ९३.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर समृद्धी शरद गिरी हिने ९२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयाचा निकाल ८८.४१ टक्के लागला असून, सानिया गणेश गाडगे हिने ९२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तेजस्विनी नाना पांढरे हिने ९०.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर अनुष्का दुर्योधन वीर हिने ९०.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक व पालकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.