

तोडफोडप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा
उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयातील घटना
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) ः रुग्णाच्या मृत्यूनंतर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात झालेल्या गोंधळाप्रकरणी अखेर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि रुग्णालयातील मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ७) मध्यरात्री डॉ. ममता पाण्डेय या अपघात विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या वेळी उपचार सुरू असताना भगवान लिंबोरे यांचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच आशा लिंबोरे, मंगेश लिंबोरे आणि शुभम लिंबोरे (रा. म्हारळगाव, ता. कल्याण) यांनी संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातल्याचा आरोप आहे. संबंधितांनी अपघात विभागातील वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली. यात मोठे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच डॉ. पाण्डेय आणि इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे रुग्णालयातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. याप्रकरणी त्या तिघांविरोधात डॉ. पाण्डेय यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.