

मुंबई विभागाची किंचित घसरण
यंदाही दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी
मुंबई, ता. ८ ः राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत यंदाही मुंबई विभागाने राज्यात तिसरे स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले असून राज्याच्या तुलनेत कोकण, कोल्हापूरनंतर सर्वाधिक असा ९४.९७ टक्के इतका निकाल लागला आहे. राज्याचा एकूण निकाल यंदा घटला असून त्यात मुंबई विभागाच्या निकालाची ०.९ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या टक्केवारीत मात्र किंचित वाढही झाली आहे.
मुंबई विभागातून दहावीच्या परीक्षेला नियमित विद्यार्थ्यांमध्ये तीन लाख ३५ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख २३ हजार ७३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील तीन लाख सात हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांचा एकूण निकाल ९३.६३ टक्के इतका असून मुलींचा निकाल तब्बल ९६.४० टक्के इतका लागला आहे. यात मुलांच्या निकालात मागील वर्षांच्या तुलनेत १.०९ टक्क्यांनी, तर मुलींच्या निकालात ०.७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा पहिल्यांदाच मुलांच्या निकालात किंचित वाढ झाली आहे.
शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई उपनगर-२ चा यंदा सर्वाधिक असा ९६.८६ टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल मुंबई उपनगर-१चा निकाल ९६.६५ टक्के आहे.
...
मुंबई विभागातील...
मुंबई विभागात येणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या निकालात यंदा एक टक्क्याहून अधिक घट झाली आहे. या जिल्ह्याचा निकाल एकूण ९५.०३ टक्के इतका आहे. पालघर जिल्ह्याचाही निकाल यंदा तीन टक्क्यांनी घसरून ९२.९२ टक्क्क्यांवर थांबला आहे. ठाणे जिल्ह्याचा निकालही किंचित कमी झाला असून तो ९५.४ टक्के इतका आहे.
...
१८,५३८ विद्यार्थ्यांची दांडी
मुंबई विभागातून परीक्षेला बसलेल्या एकूण नियमित आणि इतर अशा तीन लाख २५ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख २३ हजार ७३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील तीन लाख सात हजार ४८० उत्तीर्ण झाले, तर नोंदणी केल्यानंतर तब्बल १८ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याचे निकालावरून दिसून आले आहे.
...
मुला-मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण
मुले-मुली परीक्षेला बसलेले उत्तीर्ण एकूण टक्केवारी
मुले १,६६,६०३ १,५५,९९५ ९३.६३
मुली १,५७,१३६ १,५१,४८५ ९६.४०
...
मुंबई विभागाचा एकूण निकाल
जिल्हा एकूण विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
ठाणे १,११,३२२ १,०५,४०८ ९५.०४
रायगड ३५,४७५ ३३,४६९ ९५.०३
पालघर ६०,९३८ ५६,२६४ ९२.९२
बृहन्मुंबई २५,७०५ २४,४५९ ९६.३७
मुंबई उपनगर १ ५०,६७४ ४८,६६८ ९६.६५
मुंबई उपनगर २ ४१,८०४ ३९,२१२ ९४.८६
एकूण ३,२५,९१८ ३,०७,४८० ९४.९७
...
मुंबई विभागाचा मागील चार वर्षांतील निकाल
वर्ष- २०२३-२०२४-२०२५-२०२६
टक्केवारी- ९३.६-९३.८७-९५.८४-९४.९७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.