जव्हारमध्ये प्रथमच ‘मिस्टर अनस्टॉपेबल’ स्पर्धा

जव्हारमध्ये प्रथमच ‘मिस्टर अनस्टॉपेबल’ स्पर्धा
Published on

जव्हारमध्ये प्रथमच ‘मिस्टर अनस्टॉपेबल’ स्पर्धा
नवोदीत खेळाडूंचे प्रभावी प्रदर्शन

जव्हार, ता. ११ (बातमीदार) : जव्हार शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘मिस्टर अनस्टॉपेबल’ शरीरसौष्ठव स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील अनस्टॉपेबल फिटनेस क्लबच्या वतीने बुधवारी (ता. ६) आयोजित या स्पर्धेत फिटनेस आणि शरीरसौष्ठव क्षेत्रातील नवोदित खेळाडूंनी आपल्या मेहनतीचे प्रभावी प्रदर्शन सादर केले.

या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून ‘महाराष्ट्र श्री’, ‘भारत श्री’ तसेच ‘ठाणेश्री २०२४’ किताब विजेते संतोष शुक्ला उपस्थित होते. यावेळी जव्हार नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक दर्शन तामोरे, नकुल पटेकर, कुशील साहाणे यांच्यासह ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे हेमंत भोईर, धनंजय विखंडे, कपिल ठाकरे आणि प्रेम जव्हारे यांनी उपस्थिती दर्शवली. स्पर्धेत अनस्टॉपेबल फिटनेस क्लबमधील १३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांची तयारी मागील तीन महिन्यांपासून सुरू होती. प्रशिक्षक परिषित नीलेश आकरेकर आणि सोएल जाकीर सय्यद यांनी कठोर परिश्रम घेत स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेचे आयोजन आणि प्रायोजकत्व अनस्टॉपेबल फिटनेस क्लबचे संस्थापक कुणाल दिलीप अंभिरे यांनी केले. स्पर्धेचे नियोजन, सादरीकरण आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे उपस्थितांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात आले. जव्हारसारख्या आदिवासी भागात शरीरसौष्ठव आणि फिटनेस संस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com