नेस्को मृत्यूप्रकरणी आयोजकाला जामीन

नेस्को मृत्यूप्रकरणी 
आयोजकाला जामीन
Published on

नेस्को मृत्यूप्रकरणी
आयोजकाला जामीन

विशेष न्यायालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः गोरेगाव नेस्को येथील आयोजित संगीत कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकाला विशेष ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस’ (एनडीपीएस) न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला.
नेस्को येथे ११ एप्रिलला आयोजित संगीत कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रदर्शन केंद्राचे सुरक्षा कर्मचारी यांच्यासह सहा जणांना अटक केली. यामध्ये इन्स्पारिंग टाय प्रोडक्शनचे मालक आणि कार्यक्रमाचे आयोजक आकाश समळ याला १३ एप्रिलाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात समळ याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. इतर तीन आरोपींचा अर्ज एनडीपीएस कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या न्यायालयाने फेटाळून लावला.

याचिकाकर्त्यांचा दावा काय?
कार्यक्रमावेळी अमली पदार्थांचे वितरण किंवा सुरक्षेच्या व्यवस्थापनात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आला होता. अर्जदारासह त्याच्या कंपनीची भूमिका कलाकार व्यवस्थापनापुरती मर्यादित होती. नेस्को आणि अर्जदारात झालेल्या व्यावसायिक करारनाम्यात ही बाब स्पष्ट होते. तिकिटांची विक्री, अन्नपदार्थ, मद्य, पेये, प्रायोजकत्वासाठी मिळणारा निधी आणि इतर कोणत्याही पूरक बाबींची संपूर्ण आणि एकमेव जबाबदारी केवळ नेस्कोचीच असल्याचा दावा करून आपली अटक बेकायदा आणि मनमानी स्वरूपाची असल्याचेही समळ यांनी याचिकेत म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com