केईएम, सायन रुग्णालयांत नव्या वैद्यकीय सुविधांची भर

केईएम, सायन रुग्णालयांत 
नव्या वैद्यकीय सुविधांची भर
Published on

केईएम, सायन रुग्णालयांत
नव्या वैद्यकीय सुविधांची भर
महापौर रितू तावडे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, ता. ८ ः मुंबईकरांना अत्याधुनिक उपकरणे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध सेवांचे लोकार्पण आज (ता. ८) महापौर रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधांच्या माध्यमातून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचे महापौर म्हणाल्या.
परळ येथील के. ई. एम. रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग तसेच मॅमोग्राफी मशीन, सर्जिकल पॅथोलॉजी सेमिनार सभागृह, फिजिओलॉजी सेमिनार सभागृह यांचे लोकार्पण महापौरांच्या हस्ते झाले. त्याआधी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय धारावी येथील लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्रात बालरोग, रक्त दोष, कर्करोग व बोनमॅरो ट्रान्सप्लांट केंद्राचे लोकार्पणदेखील करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे, स्थानिक नगरसेवक किरण तावडे, स्थानिक नगरसेविका अर्चना शिंदे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेंद्र मोहिते, अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, अधिष्ठाता डॉ. हरिश पाठक, ‘वेहा फाउंडेशन’च्या रुमाना हमीद आदी आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी महापौर तावडे म्हणाल्या की, स्तनाचा कर्करोग महिलांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान आहे, परंतु वेळेत तपासणी, वेळीच निदान आणि योग्य उपचाराच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण मिळवता येते.

पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण सेवा पालिकेच्या रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचा अभिमान आहे.
-रितू तावडे, महापौर

महिला रुग्ग्‍णांना दिलासा
रुग्णालयात मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध झाल्याने महिलांना तपासणीसाठी इतरत्र धावपळ करावी लागणार नाही. या उपकरणामुळे महिलांमध्ये नियमित तपासणीची सवय वाढेल. निदानातील विलंब कमी होईल आणि कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेला बळ मिळेल, असे महापौर तावडे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com