भिवंडी तालुक्याचा दहावीचा निकाल ९०.५६ टक्के

भिवंडी तालुक्याचा दहावीचा निकाल ९०.५६ टक्के
Published on

भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील ६५ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या ५ हजार ५१४ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ४९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ९०.५६ टक्के लागला आहे. यामध्ये १५ शाळांनी १०० टक्के निकालाची कामगिरी नोंदवली आहे.
बी. ए. राऊत विद्यालय पाच्छापूर, खंबाळा विभाग हायस्कूल खंबाळा, माध्यमिक विद्यालय नांदकर सांगे, शिव खांडेश्वरी विद्यामंदिर लोनाड, अल उम्मत इंग्लिश हायस्कूल, टी. ए. पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल पडघा, टी. ए. पाटील गुरुकुल सेमी इंग्लिश मीडियम हायस्कूल पडघा, डीवाईन इंग्लिश मीडियम हायस्कूल, आर. के. पालवी विद्यामंदिर, विवेकानंद पब्लिक स्कूल, पडघा उर्दू हायस्कूल, संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल अंजूर, ओम साई इंग्लिश मीडियम हायस्कूल, के. आर. मालदे इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि देविका इंग्लिश मीडियम हायस्कूल काल्हेर या शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ९६२ विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणी, १ हजार ६११ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर ७९५ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणीत यश संपादन केले आहे.

‘संस्कार’ची यशाची परंपरा
अंजूर येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलने सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकालाची अखंड परंपरा कायम राखली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत संस्कृती पाटील हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष राम माळी यांच्यासह संचालक मंडळाने तिचे अभिनंदन केले आहे. अंजूर, भरोडी, अलिमघर, सुरई, सारंगगाव, वेहेळे, भाटाळे, माणकोली आणि अंजूरदिवे या नऊ गावांतील तरुणांनी एकत्र येऊन या शाळेची स्थापना केली होती. अल्प शुल्कात इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या शाळेचे मुख्याध्यापक संदेश पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com