‘कमलादेवी’च्या दोन्ही शाळांची उत्कृष्ट कामगिरी

‘कमलादेवी’च्या दोन्ही शाळांची उत्कृष्ट कामगिरी
Published on

कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी लागला असून, यात कमलादेवी पब्लिक स्कूल आणि कमलादेवी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलचा उत्कृष्ट निकाल लागला असून, या परिसरात आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. कमलादेवी शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या कमलादेवी पब्लिक स्कूलने ९६ टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण मिळवले आहे. शाळेतील १६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याव्यतिरिक्त, १७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी आणि १० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले. हेमा मल्लाहने ८८ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. सुजित कन्नौजिया ८५ टक्क्यांसह दुसऱ्या, तर शोभा सिंग ८४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आली. तर कमलादेवी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलने १०० टक्के निकाल नोंदवून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनमोल पटेलने ९५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. हिमांशी तोमर ८८ टक्के गुणांसह दुसऱ्या, तर अनन्या गुप्ता ८३ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com