मुंबईतील १८ रात्रशाळांचा निकाल १०० टक्के

मुंबईतील १८ रात्रशाळांचा निकाल १०० टक्के
Published on

मुंबईतील १८ रात्रशाळांचा निकाल १०० टक्के
मुंबई, ता. ८ : संचमान्यता आणि शालेय शिक्षण विभागाने राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे अखेरच्या घटका मोजणाऱ्‍या मुंबईतील तब्बल १८ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. सरकारने कष्टकरी, कामगार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या रात्रशाळा जिवंत राहाव्यात यासाठी सर्वसामावेशक धोरण आखण्याची मागणी या निकालाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

रात्रशाळा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मासूम या संस्थेचे योगदान या निकालामुळे अधोरेखित झाले आहे. मुंबईतील १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये बोरिवली येथील नालंदा मराठी नाइट हायस्कूल, तसेच पीपल्स इंग्लिश नाइट हायस्कूल, भायखळा, अहिल्या नाइट हायस्कूल, काळाचौकी, भारती विद्यामंदिर हिंदी नाइट हायस्कूल, घाटकोपर (पश्चिम), बॉम्बे फोर्ट नाइट हायस्कूल, फोर्ट, गुरुनारायण नाइट हायस्कूल, सांताक्रूझ, जे.ई.एस. आगारकर नाइट हायस्कूल, वरळी नाका, महालक्ष्मी हिंदी नाइट हायस्कूल, मुंबई, मराठा मंदिर वरळी नाइट हायस्कूल, वरळी, मुलुंड नाइट हायस्कूल, मुलुंड (पश्चिम), शमनंद नाइट हायस्कूल, घाटकोपर (पश्चिम), सहकार नाइट हायस्कूल, लोअर परळ, सार्वजनिक नाइट हायस्कूल, दादर, विद्या विकास नाइट हायस्कूल, घाटकोपर, घाटकोपर एस.पी.एम. रात्रशाळा, घाटकोपर आणि संत ज्ञानेश्वर नाइट हायस्कूल, कुर्ला (पश्चिम) या शाळांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com