

सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीला जामीन नाहीच
मुंबई, ता. ८ : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या चेतन पारधीला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. पारधीविरोधात गुन्ह्यात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्या. आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने त्याची जामिनाची याचिका फेटाळून लावली. पारधीवर सिद्दीकीची हत्या आणि कट रचणाऱ्या संघटित टोळीचा सदस्य असल्याचा आरोप आहे.
पारधीचे नाव सह-आरोपीच्या जबाबात स्पष्टपणे नमूद असून, कोणाची तरी हत्या करण्याच्या कटाची माहिती त्याला होती, असे जबाबही उपलब्ध आहे. त्यामुळे, सिद्दीकींच्या पत्नीने याप्रकरणी हस्तक्षेप याचिका करून उपस्थित केलेला मुद्दा योग्य असल्याचे न्यायालयाने पारधीची याचिका फेटाळताना नमूद केले. त्यामुळे आरोपीची भूमिका दर्शवणारे पुरावे नोंदीवर उपलब्ध असल्याचेही एकलपीठाने पारधीची याचिका फेटाळताना स्पष्ट केले.
...
प्रकरण काय?
वांद्रे पूर्व येथील मुलगा आणि माजी आमदार झिशानच्या कार्यालयाबाहेर सिद्दीकींवर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सिद्दीकींची हत्या कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने केल्याचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.