

टेम्पोच्या धडकेत बालिकेचा मृत्यू
भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : टेम्पोने धडक दिल्याने दोनवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. काशी मिरा भागातील धोंड माशाचा पाडा भागात गुरुवारी (ता. ७) ही घटना घडली. पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली आहे. मनोज पटवा हे आपल्या दोनवर्षीय आयुशी या मुलीसह पायी चालत घरी जात होते. अचानक मागच्या बाजूस उभा असलेला टेम्पोचालकाने सुरू केला व त्याची जोरदार धडक वडिलांच्या मागून चालत असलेल्या आयुशीला बसली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. काशीगाव पोलिसांनी चालक राणा चौहान याला अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.