एलआयसीच्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार

एलआयसीच्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार
Published on

‘एलआयसी’च्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा होणार पुनर्विकास

मुंबई, ता. ९ : मुंबई शहरातील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मालकीच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. त्यासाठी म्हाडाच्या मुख्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘एलआयसी’सोबत पुनर्विकासाबाबत चर्चा झाली. या वेळी एलआयसी या इमारतींचा स्वतः पुनर्विकास करण्यास इच्छुक असल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यानुसार म्हाडा सर्वतोपरी सहकार्य करेल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

मुंबई शहरात एलआयसीच्या मालकीच्या ६८ उपकरप्राप्त इमारती असून त्या फोर्ट, गिरगाव, माटुंगा व दादर परिसरात आहेत. या इमारतींमध्ये मोठ्या संख्येने निवासी, अनिवासी भाडेकरू, रहिवासी वास्तव्यास आहेत; मात्र या इमारती मोडकळीस आल्याने पुनर्विकासाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने एलआयसीसोबत बैठक आयोजित केली होती. या वेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि एलआयसीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संबंधित इमारतींची सद्यस्थिती, भाडेकरूंच्या पुनर्वसनाची आवश्यकता, पुनर्विकास प्रक्रियेसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तसेच पुढील टप्प्यातील नियोजन यावर सखोल विचारविनिमय करण्यात आला.

कुठे किती इमारती?
- फोर्ट - ३९
- गिरगाव - १८
- माटुंगा - ३
- दादर - ८
- निवासी भाडेकरू - ८१५
- अनिवासी भाडेकरू - ९४९
- एकूण - १,७६४ भाडेकरू, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com