ठाण्यात पहाटेपासून आगीच्या तीन घटना

ठाण्यात पहाटेपासून आगीच्या तीन घटना
Published on

ठाण्यात पहाटेपासून आगीच्या तीन घटना
ठाणे, ता. ९ : ठाणे शहरात शनिवारी पहाटेपासून सकाळपर्यंत आगीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. कोपरी, मानपाडा आणि वर्तकनगर परिसरात लागलेल्या या आगींमध्ये वाहनांचे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
पहिली घटना पहाटे ४.१९ वाजण्याच्या सुमारास कोपरी येथील भास्कर टॉवरजवळ घडली. येथे पार्क केलेल्या तीन दुचाकींना अचानक आग लागली. या आगीत एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली, तर अन्य दोन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ४.३४ वाजता आग आटोक्यात आणली.
दुसरी घटना सकाळी ५.४० वाजता घोडबंदर रोडवरील मानपाडा ब्रिजजवळ, दोस्ती इम्पेरिया इमारतीसमोर घडली. न्हावासेवा ते सिल्वासा मार्गावर जाणाऱ्या एका कंटेनरच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग लागली होती. अग्निशमन दलाने वेळीच कारवाई करत आग नियंत्रणात आणली. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने कंटेनर रस्त्याच्या कडेला हलविण्यात आला.
तिसरी घटना सकाळी ९.५० वाजता वर्तकनगर पोलिस ठाण्याजवळील भीमनगर परिसरात घडली. येथे पार्क केलेल्या एका चारचाकी कारला अचानक आग लागली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग पूर्णपणे विझवली. या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com