

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शिल्पाचे अनावरण
मालाड, ता. ९ (बातमीदार) : मालाड पश्चिम लिबर्टी गार्डन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या विकासनिधीतून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शिल्पाचे अनावरण माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते शनिवारी (ता. ९) करण्यात आले. हे स्मारक १९८७ला माजी नगरसेवक मधुकर राऊत यांनी उभारले होते. १९९९ला प्रभाग समिती अध्यक्ष असताना अशोक पटेल यांनी या स्मारकाचे सुशोभीकरण केले होते. त्यानंतर २०१४ मध्ये नगरसेविका अनघा म्हात्रे यांनी या स्मारकाचे सुशोभीकरण केले होते, आता याठिकाणी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या विकासनिधीतून याठिकाणी सावरकर यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास विभागप्रमुख संतोष राणे विभाग समन्वयक अशोक पटेल, विधानसभाप्रमुख कैलास कणसे, विधानसभा संघटक गणेश गुरव, विधानसभा संघटक मीना कारंडे, नगरसेविका गीता भंडारी, सचिन पाटील विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.