‘कामवारी’च्या पुनरुज्जीवनासाठी निधीची मागणी

‘कामवारी’च्या पुनरुज्जीवनासाठी निधीची मागणी
Published on

भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार महेश चौघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील वाढत्या नदी प्रदूषणाच्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करून राज्यातील प्रदूषित नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५च्या अहवालानुसार देशातील २९६ प्रदूषित नदी पट्ट्यांपैकी तब्बल ५४ नदी पट्टे हे महाराष्ट्र राज्यातील असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणारी कामवारी नदी ही ग्रामीण व शहरासाठी अत्यंत महत्त्वाची नदी असून, सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, सांडपाणी विसर्ग, घनकचरा टाकणे, अतिक्रमणे तसेच अनियोजित नागरीकरणामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

शहरातील अनेक नाले व सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीचे पाणी अत्यंत दूषित झाले असून पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य तसेच जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. कामवारी नदी ही केवळ जलस्रोत नसून भिवंडी शहराच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणे, दुर्गंधी, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम तसेच भूजल पातळीवर होणारा विपरीत परिणाम या सर्व बाबींचा विचार करता या नदीचे पुनरुज्जीवन तातडीने करणे अत्यावश्यक झाले आहे.

विशेष कृती आराखडा
महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’अंतर्गत कामवारी नदीचा समावेश करून तिच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात यावा. तसेच नदी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नदीपात्रातील गाळ काढणे, अतिक्रमण हटविणे, हरित पट्टा विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन आणि नदी संवर्धनासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार महेश चौघुले यांनी केली असून, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरविकास विभाग, पर्यावरण विभाग तसेच भिवंडी महापालिका यांना समन्वयाने कार्यवाही करण्याचे तातडीने निर्देश देण्याची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com