अनधिकृत फेरीवाल्यांवर पोलिस बंदोबस्तात

अनधिकृत फेरीवाल्यांवर पोलिस बंदोबस्तात
Published on

बेकायदा फेरीवाल्यांविरोधात मोहीम
बोईसर पोलिसांच्या बंदोबस्तात आजपासून कारवाई

बोईसर, ता. १० (वार्ताहर) ः बोईसर शहरातील वाढत्या फेरीवाल्यांवर ग्रामपंचायतीने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. याच अनुषंगाने ११, १३ आणि १६ मे रोजी पोलिस बंदोबस्तात मोहीम राबवली जाणार आहे. मुख्य रस्ते, पदपथ, गर्दीच्या ठिकाणावरील टपऱ्या, दुकानांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र सध्या बोईसरमध्ये दिसत आहे. अनेक ठिकाणी पदपथांवरील अतिक्रमणाने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
-----------------------
‘थातूरमातूर कारवाई नको’
बोईसर ग्रामपंचायतीने यापूर्वीही कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मागविला होता; मात्र तांत्रिक कारणांमुळे कारवाई रखडली होती. आता अखेर पोलिस संरक्षण मिळाल्याने प्रशासन कारवाईसाठी सज्ज झाले आहे; पण थातूरमातूर कारवाई करून उपयोग नाही. अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com