विरारच्या नंदाखाल येथे रंगतो

विरारच्या नंदाखाल  येथे रंगतो
Published on

शूटिंग बॉल स्पर्धेत चुरशीचे सामने
नंदाखाल येथे राज्यभरातील १६ संघ सहभागी

विरार, ता. १० (बातमीदार) ः विरारमधील नंदाखाल येथे राष्ट्रीय स्तरावरील शूटिंग बॉल स्पर्धेचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत कोटा, दिल्ली, यूपी, गाझियाबादसह राज्यातील संघांमध्ये अत्यंत चुरशीचे सामने होत आहेत.
विरार नंदाखाल येथील स्वर्गीय मनवेल कोरिया मैदानावरील राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेचे उद्घाटन महापौर अजीव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. क्रीडा क्षेत्रात नवोदितांना प्रोत्साहन मिळावे, आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने क्रीडा साहित्य बँकेची स्थापना करण्यात आली आहे. शूटिंग बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला २५ हजार रुपये, ट्रॉफी देण्यात आली असल्याची माहिती आयोजक रिचर्ड कोरिया यांनी दिली. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळाले आहे.
========================================
वसईची संस्कृती, निसर्ग अनुभवण्याची संधी देशभरातून आलेल्या संघांना मिळणार आहे. वसई-विरार पालिका अशा उपक्रमांच्या पाठीशी नेहमीच उभी आहे.
- अजीव पाटील, महापौर, वसई-विरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com