मंगल कार्यात विजेचा खोडा,

मंगल कार्यात विजेचा खोडा,
Published on

शुभकार्यात विजेचे शुक्लकाष्ठ
मोखाड्यातील लग्नसोहळ्यांच्या आनंदावर विरजण
मोखाडा, ता. १० (बातमीदार)ः मोखाडा तालुक्यातील आदिवासी भागात लग्नकार्याची धामधूम सात ते आठ दिवस चालते. या काळात पारंपरिक पद्धतीने हळद, देवादेवी, मांडव, लग्नाची गाणी म्हटली जातात. घरासमोरील मांडवाला विद्युत रोषणाई केली जाते. मात्र, मंगलमय वातावरणात सततच्या खंडित वीजपुरवठ्याने खोडा घातला असून, वधू-वरांच्या आनंदावर विरजण घातले आहे.
आदिवासी भागात लग्नघरी हळद कुटताना, दळताना, गोडधोड करताना पांरपरिक रूढी-परंपरा आजही जपल्या जातात. सध्या तालुक्यात मोठ्या संख्येने लग्नसराईची धूम आहे. गाव-पाड्यांत लग्नसराईमुळे मंगलमय वातावरण आहे. घरासमोरील मांडवाला विद्युत रोषणाई केलेल्या आहेत. रात्री गाण्यांसह, काही भागांत डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटला जातो. आपआपल्या ऐपतीनुसार अथवा कर्ज काढून सोहळे केले जातात. मात्र, मंगलमय वातावरणात महावितरणाने खोडा घातला असून, सातत्याने कमी दाबाचा तसेच वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे लग्नसोहळ्यातील हौसमौजेवर विरजण फेरले आहे.
---------------------------
संतापाची लाट
महावितरणकडून व्हाॅटसॲपच्या माध्यमातून खंडित वीजपुरवठ्याबाबत कळवले जाते. डहाणु, सूर्यानगर, गंजाड येथे तांत्रिक बिघाड होत असल्याचे कारण वारंवार दिले जात आहे. खंडित वीजपुरवठा तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी हैराण आहेत, तर वाढत्या उन्हामुळे खंडित वीजपुरवठ्याने संतापाची लाट आहे.
---------------------------
लग्नकार्य असल्याने, वधू-वरांचे वडील सढळ हस्ते खर्च करतात. मात्र, हा खर्च खंडित विजपुरवठ्यामुळे वाया जात आहे. या समस्येवर आमदार, खासदारांचे दुर्लक्ष होत आहे.
- नामदेव ठोंबरे, ग्रामस्थ, जोगलवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com