एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची दहावीत चमक

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची दहावीत चमक
Published on

कल्याण, ता. १० (बातमीदार) : दहावीच्या निकालात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. कल्याण व विठ्ठलवाडी आगारांत कार्यरत असलेल्या चालक, वाहक, यांत्रिक आणि लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींनी प्रतिकूल परिस्थितीत अभ्यासाची जिद्द कायम ठेवत ९५ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.

​विठ्ठलवाडी आगारातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी निकालात आघाडी घेतली आहे. यामध्ये वेद जयप्रकाश गिड याने ९५.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कल्याण आगारातील लिपिक व यांत्रिक विभागातील पाल्यांनीही उत्तम कामगिरी केली आहे. ​या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व कर्मचारी संघटनांनी कौतुक केले आहे. एसटी कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावत असताना त्यांच्या मुलांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून, यामुळे एसटी परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे, अशा भावना एसटी संघटनेचे विभागीय अध्यक्ष योगेंद्र कदम यांनी व्यक्त केल्या.

वेद गिड (९५.४० टक्के), वैष्णवी नलावडे (८५.५० टक्के), इच्छा बेसे (८५ टक्के), आयुषी चौधरी (८५.६० टक्के), श्रेयस चौधरी (८१.५० टक्के), ज्ञानेश्वरी शेळकर (७४.४० टक्के), कृपा चव्हाण (७६ टक्के), नैविक पाटील (८९.२० टक्के), हर्षला सांबेकर (६४ टक्के), सार्थक वालीनकर (६१.२० टक्के), रिया कदम (५८ टक्के),
तनुजा सानप (५५.६० टक्के), अनुष्का शिर्के (९५ टक्के), कुशात बडगुजर (९२.६० टक्के), श्रावणी कोकरे (८१.२० टक्के).​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com