बुराण स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

बुराण स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
Published on

बुराण स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित मंडळाचे माजी अध्यक्ष अन्वर बुराण यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्ह्यातील १४ वर्षांखालील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला नुकताच पोयनाड येथील झुंझारच्या क्रीडांगणावर शुभारंभ करण्यात आला. सदरच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील आठ संघांनी सहभाग घेतला असून, स्पर्धेतील सामने ४० षटकांचे असणार आहेत. स्पर्धा प्रथम साखळी व त्यानंतर बाद फेरीनुसार आयोजित केली आहे. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग विरुद्ध कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी रिलायन्स लोधीवली या संघांमध्ये खेळला गेला. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी झुंझार युवक मंडळाचे सचिव किशोर तावडे, खजिनदार दीपक साळवी, सदस्य अजय टेमकर, तहसीन बुराण, आलीजा बुराण, प्रशिक्षक समीर सुर्वे, जगदीश ढगे, ॲड.पंकज पंडित, चैतन्य राऊत, आदेश नाईक यांच्यासह खेळाडू व क्रिकेटप्रेमी मंडळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com