दादरमध्ये दहावीचा निकाल शंभर टक्के

दादरमध्ये दहावीचा निकाल शंभर टक्के
Published on

दादरमध्ये दहावीचा निकाल शंभर टक्के
प्रभादेवी, ता. १० (बातमीदार) ः प्रभादेवी येथील महापालिका शाळेतील दहावीच्या वर्गात बसलेले ४४ सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले, तर सानेगुरुजी शाळेतील २४ हून अधिक विद्यार्थी ९० टक्के गुणांनी पास झाल्याचे शाळेच्या वैशाली वझे यांनी सांगितले.
तर दादरच्या एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून, ७६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तसेच ३४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर १० विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवून यश संपादन केले आहे. याच शाळेतील दहावीतील विद्यार्थिनी इरा जाधव हिने ७८ टक्के गुण मिळवले. इराने नवी दिल्ली येथे आयोजित बीसीसीआयच्या प्रतिष्ठेच्या ‘जगमोहन डालमिया ट्रॉफी’वर आपले नाव कोरले आहे. तसेच टी-२० मुंबई महिला लीगमध्ये इरा जाधव ही सर्वाधिक बोली लागलेली खेळाडू ठरली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com