कलेसोबत अभ्यासातही अव्वल

कलेसोबत अभ्यासातही अव्वल
Published on

कलेसोबत अभ्यासातही अव्वल
नृत्यकलेसोबत आर्याची दहावीत उज्ज्वल कामगिरी

जोगेश्‍वरी, ता. १० (बातमीदार) ः जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य करता येतात, हे जोगेश्वरीतील आर्या शिरोडकर हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. अंधेरी पूर्व येथील कनोसा हायस्कूल या शाळेत शिक्षण घेत असलेल्या आर्याने नृत्‍याची कला जोपासत दहावीच्या परीक्षेत तब्बल ९५ टक्के गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
अभ्यासाच्या ओझ्याखाली स्वतःची आवड आणि कला विसरणाऱ्या तरुणांसाठी नेहमीच पालकांचा असा समज असतो, की मुलांनी डान्स किंवा इतर छंदांमध्ये अधिक लक्ष दिल्यास त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो; मात्र आर्याने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. आर्या केवळ अभ्यासातच अव्वल नाही, तर ती रिदम डान्स अकॅडमीची एक महत्त्वाची सदस्य आहे. अकॅडमीच्या विविध सादरीकरणांमध्ये ती ‘लीड डान्सर’ म्हणून आपल्या उत्कृष्ट नृत्यकलेची छाप पाडते. आर्या हिने श्यामनगरचा राजा मंडळाच्या अधिकृत गाण्याच्या व्हिडिओमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com