कल्याण-डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट

कल्याण-डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट
Published on

कल्याण, ता. १० (बातमीदार) : कल्याण, डोंबिवली परिसरात दोन वेगवेगळ्या घरफोड्यांच्या घटनांमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात घरफोड्यांची मालिका सुरूच असल्याचे समोर आले आहे. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी कपाटातील मौल्यवान दागिने आणि रोकड चोरून नेली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, डोंबिवली पश्चिमेकडील वाटवेवाडी परिसरातील ‘भास्कर निवास’ इमारतीतही चोरीची घटना घडली. रमेश साळवी (७६) यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून पसार झाला. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमिला कावळे आणि त्यांचे पथक आरोपीचा शोध घेत आहे.

फेरीवाल्यांच्या वेशात ‘रेकी’?
एप्रिल ते जून या उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात सराईत आणि भुरटे चोर सक्रिय होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. दिवसा फेरीवाले किंवा विक्रेते बनून परिसरात फिरणे आणि कोणती घरे बंद आहेत याची ‘रेकी’ केली जात आहे. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीतील आठही ठाण्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि स्थानिक पोलिसांनी रात्रंदिवस गस्त वाढवून संशयितांवर लक्ष ठेवावे; तसेच चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, असे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com