

उलवे, ता. १० (बातमीदार) : अटल सेतू (एमटीएचल) गव्हाण टोलनाका परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर सिडको प्रशासनाने अखेर निष्कासन कारवाई केली आहे. सिडकोच्या मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे विभागामार्फत बुधवारी (ता. ७) ही कारवाई करण्यात आली.
सिडकोकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जाहिरात फलक हे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचे उल्लंघन करून उभारण्यात आले होते. तसेच या फलकांसाठी सिडको महामंडळाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे संबंधित फलक निष्कासित करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात एमएमआरडीएकडूनही संबंधित जाहिरात फलक हटविण्याबाबत सिडकोला कळविण्यात आले होते. त्यानंतर सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाने प्रत्यक्ष कारवाई करत फलक हटविले.
कठोर कारवाई करावी
मोठमोठे जाहिरात फलक उभारले जात असताना प्रशासनाला याची माहिती नव्हती का?, तेव्हा अधिकारी गप्प बसले होते का?, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत तसेच अटल सेतूसारख्या अतिमहत्त्वाच्या मार्गालगत मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक उभारले जाणे, ही बाब एका दिवसात घडलेली असून, त्यासाठी संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष किंवा संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ फलक हटवून कारवाई पूर्ण न करता, यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व संबंधितांवरही चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उलवे : अटल सेतू (एमटीएचल) गव्हाण टोलनाका परिसरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘सिडको’ने कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.