

नाराजीच्या चर्चांना सुधाकर घारेंचा पूर्णविराम
कर्जत, ता. १० (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आपल्या नाराजीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. कर्जत येथील पक्ष कार्यालयात रविवारी आयोजित (ता. १०) पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देत, आपण पक्षावर नाराज नसून सर्व चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले.
मोहपाडा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर आपल्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काही दिवस विश्रांती घेण्यासह बोलणे टाळण्यास सांगितले होते. त्यामुळेच दोन-तीन दिवस मोबाईल फोन बंद ठेवला होता. याच काळात आपण ‘नॉट रिचेबल’ असल्याने विविध गैरसमज पसरल्याचे घारे यांनी सांगितले.
“सुनील तटकरे हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षाचे काम करत आहोत. कर्जत-खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रभावी पक्ष बनला आहे,” असेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद निवडणुकीत आठपैकी सात जागांवर विजय मिळवत पक्षाने आपली ताकद सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते एकदिलाने काम करत असून, महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्येही समन्वय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
----
‘...नाहीतर ते एकतर्फी प्रेम’
आमदार महेंद्र थोरवे यांनी अलीकडेच सुनील तटकरे यांच्याशी संबंध सुधारल्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सुधाकर घारे यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले. “प्रेम करायचे असेल, तर दोन्हीकडून प्रतिसाद मिळाला पाहिजे; नाहीतर ते एकतर्फी प्रेम ठरते,” असे म्हणत त्यांनी हलक्याफुलक्या शब्दांत थोरवे यांच्या वक्तव्यावर टोला लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.