

रत्नाकर तांडेल यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
तुर्भे (बातमीदार) : करावे गावात शैक्षणिक चळवळ उभी करण्यापासून ते शैक्षणिक क्षेत्रात करावे गावचे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध करणारे रत्नाकर गोपीनाथ तांडेल यांचा कृतज्ञता सोहळा गुरुवारी (ता. ७) ज्ञानदीप विद्यालय, करावे गाव प्रांगणात विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने पार पडला. या सोहळ्यानिमित्त करावे गावातील असंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवत आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. या वेळी पीएचडीधारक, सीएपासून ते सरकारी सेवेत उच्चपदस्थ आणि आणि अनेक कार्यक्षेत्रात यशस्वी झालेले तांडेल सरांचे विद्यार्थी एकत्र गोळा झाले होते. या सोहळ्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती एकनाथ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी पाटील यांनी आपल्या मनोगतात तांडेल सरांच्या महाविद्यालयीन दिवसांची आठवण काढत त्यांच्या कार्याची महती अध्यात्मिक दाखले देऊन केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.