

देशी पिस्तुलासह
तरुणाला अटक
उल्हासनगर : उल्हासनगरच्या सेंच्युरी ग्राउंड परिसरात बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. रोहित सुनील मोरे ऊर्फ पानपाटील असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. हा मुद्देमाल २५ हजार ५०० रुपयांचा असून, आरोपीने हे शस्त्र उत्तर प्रदेशातील एका अनोळखी व्यक्तीकडून विकत घेतल्याची माहिती तपासात समोर आली. ठाणे पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मध्यवर्ती पोलिस अधिक तपास करीत आहेत.