

मालेगाव : शहरात सुरू असलेल्या गोवंश तस्करी विरोधातील मोहिमेत पोलिसांनी कारवाई करत महापालिकेतील ‘एमआयएम’चे गटनेते आणि माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत तब्बल अडीच लाख रुपये किमतीची गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून, माजी महापौरच या प्रकरणात आरोपी ठरल्याने शहरात खळबळ
उडाली आहे.
पोलिसांनी संवदगाव फाटा परिसरातील अब्दुल मलिक यांच्या ‘फार्म हाउस’वर छापा टाकली असता, दहा गोवंश जनावरे निर्दयपणे बांधून ठेवलेली आढळली. पोलिसांनी जनावरे जप्त केली. इस्लामाबाद भागातील त्यांच्या घराशेजारील गोदामावर छापा टाकत आणखी पाच जनावरे ताब्यात घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.