अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Published on

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पालघर, ता. १० : पालघर-मनोर राष्ट्रीय महामार्गावर शेलवाळी गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. शनिवारी रात्री केटी कंपनीसमोर हा अपघात घडला. किशोर जाधव (३५) असे मृताचे नाव आहे. जखमी नाना राहुल गावित आणि अंकित काशिनाथ माळी यांना उपचारासाठी सिल्वासा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, पालघर शहरात वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com