

वज्रेश्वरी, ता. ११ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यात कृषी विभागाकडून प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन ‘अल निनो’च्या संभाव्य परिणामांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हवामान बदल, कमी पावसाची शक्यता आणि खरीप हंगामातील नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशांत महासागरातील पाणी गरम झाल्यानंतर जगभरातील वारे आणि पावसाच्या स्वरूपात बदल होतो. त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या हवामानावर होत असून, त्याचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसत आहे. परिणामी, शेती उत्पादनावरही परिणाम होत असल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ब्राह्मणगाव येथे सहाय्यक कृषी अधिकारी यश पवार यांच्या मार्गदर्शनाखालील कार्यशाळेत शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमात वामन धिंडा, विनायक धिंडा, भानुदास जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन लगडे यांनी विशेष सहकार्य केले. आगामी खरीप हंगामासाठी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीसाठी शेतकरी गट तयार करण्यात आले असून, गटशेतीचे महत्त्वही कृषी अधिकाऱ्यांनी पटवून दिले.
कृषी योजनांची माहिती
तालुक्यातील संपूर्ण आदिवासी क्षेत्र असलेल्या ब्राह्मणगाव परिसरात खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीच्या माध्यमातून गावोगावी विविध कृषी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच ‘अल निनो’मुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता, भात लागवडीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत शेतकऱ्यांना ‘अल निनो’च्या संभाव्य परिणामांपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी, माती परीक्षणाचे महत्त्व, कृषी विभागाच्या विविध योजना तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.