अतिक्रमण हटाव मोहिमेत टपऱ्या जमीनदोस्त

अतिक्रमण हटाव मोहिमेत टपऱ्या जमीनदोस्त
Published on

पदपथांवरील अतिक्रमणांवर बुलडोझर
बोईसर ग्रामपंचायतीची कारवाई, शेकडो टपऱ्या जमीनदोस्त

बोईसर, ता. ११ (वार्ताहर) : शहरातील मुख्य रस्ते, पदपथ तसेच पदपथांवर अतिक्रमणावर बोईसर ग्रामपंचायतीने सोमवारी धडक दिली. या वेळी पोलिसांच्या बंदोबस्तात अनेक टपऱ्या, स्टॉल जेसीबीने जमीनदोस्त केले गेले.
कामतेश्वर मंदिर ते बस डेपो परिसरात सकाळपासूनच मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ओसवाल परिसरासह मुख्य बाजारपेठेतील पदपथ, रेलिंगच्या मधोमध उभारलेल्या टपऱ्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून मार्ग काढावा लागत होता. परिणामी, वाहतूक कोंडीबरोबर अपघातांचा धोका वाढला होता. या अतिक्रमणांचा महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने कारवाईची मागणी होत होती.
----------------------------
कायमचा तोडगा
मोहिमेदरम्यान ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. जेसीबी, ट्रॅक्टर, हायड्रा अशा यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. तसेच कारवाईत हटवलेले साहित्य जप्त केले. तसेच पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी त्वरित रेलिंग बसविण्यात आले.
-----------------------------
जनमताची अपेक्षा
बोईसर ग्रामपंचायतीने अतिक्रमणविरोधी केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे; पण ही कारवाई दिखाऊ नसावी. तर बोईसर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com