टॅंकर पुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात

टॅंकर पुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात
Published on

टॅंकरपुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात
मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाचा आरोप
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेची टॅंकरपुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही निविदा प्रक्रिया केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सिव्हीसी) मार्गदर्शक तत्त्वानुसार झाली नसल्याचा आरोप थेट महासभेत करण्यात आला आहे. त्यामुळे महापौरांनी ही निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
नळजोडणी नसलेल्या इमारती, झोपडपट्ट्या, आदिवासी पाडे आदींना पालिकेकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. महापालिका यासाठी खासगी कंत्राटदाराकडून प्रती फेरीचे पैसे देते. मात्र, टॅंकरचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीची पालिकेने केलेल्या निविदा प्रक्रियेला आव्हान देण्यात आले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याचा आरोप प्रभाग समिती सभापती प्रशांत दळवी यांनी केला आहे. शिवाय महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदार नियुक्तीची निविदा प्रक्रिया अयोग्य असल्याचा आक्षेप घेतला आहे.
--------------------
कंत्राटदारांच्या नियुक्तीला आक्षेप
नियुक्त कंत्राटदारांना कोणताही अनुभव नाही. त्यामुळे विशिष्ट कंत्राटदाराला निविदा देण्यासाठीच निविदा प्रक्रिया राबावण्यात आल्याचा आरोप दळवी यांनी महासभेत केला आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौर डिंपल मेहता यांनी निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी फेर निविदा प्रक्रिया करावी, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
--------------------

Marathi News Esakal
www.esakal.com