भिवंडीत बुधवारी पाणीपुरवठा बंद

भिवंडीत बुधवारी पाणीपुरवठा बंद
Published on

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : स्टेम प्राधिकरणामार्फत टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातील केबल दुरुस्ती व भिवंडी जलवाहिनी गळती दुरस्तीची कामे तातडीने करावयाची आहेत. त्यामुळे बुधवारी (ता. १३) सकाळी ९ वाजल्यापासून गुरूवारी (ता. १४) सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भिवंडी शहरांसाठी स्टेममार्फत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुढील एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांनी दिली आहे. शहरातील जवळ-जवळ सर्वच भाग प्रभावित होणार आहेत, असे पालिकेने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com