काव्य, नृत्य, गाण्यांची रंगणार मैफल

काव्य, नृत्य, गाण्यांची रंगणार मैफल
Published on

ठाणे (बातमीदार) : विष्णूनगर भागात ‘मी मनमुक्ता’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी (ता. १४) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. महापालिका शाळा क्रमांक १९ येथील घंटाळी मंदिराजवळील रोटरी हॉलमध्ये होणाऱ्या साधना ठाकूर यांची संकल्पना आणि निर्मिती असलेल्या कार्यक्रमात काव्य, नृत्य आणि गाणी यांचा अनोखा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. सोहळ्याचे उद्‍घाटन माधवी घारपुरे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य पाहुण्या म्हणून मेधा सोमण उपस्थित राहणार आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com