

अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : नगर परिषद संचालित शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोफत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश चलवादी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षण विभागप्रमुख किमया पवार यांना निवेदन सादर केले.
अनेक विद्यार्थी शाळेपासून चार ते पाच किमीवरून दररोज प्रवास करून शिक्षण घेत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक सुविधेअभावी काही विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीवर परिणाम होत असून, सुरक्षित आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राहण्यास मदत होईल, असेही चलवादी यांनी म्हटले आहे. पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मोफत बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.