मातीच्या ढीगामुळे अपघाताचा धोका

मातीच्या ढीगामुळे अपघाताचा धोका
Published on

मातीच्या ढिगामुळे अपघाताचा धोका

बोईसर, ता. ११ (वार्ताहर) : बोईसर-तारापूर मुख्य रस्त्यावरील डीजे नगर नाक्याजवळील दोन्ही वळणांवर टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगांमुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक दिवस उलटूनही संबंधित यंत्रणेकडून ही माती बाजूला करण्यासंदर्भात होणारे दुर्लक्ष पाहता वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य रस्त्यावरच माती पसरल्यामुळे दुचाकी वाहन घसरण्याचे प्रकार वाढले असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः वळणाच्या ठिकाणी माती साचल्याने वाहनांचा तोल जाण्याचा धोका अधिक वाढला आहे. या मार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. जवळच रुग्णालयेही असल्याने रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
-----------------
तातडीने पाहणी करून रस्त्यावरील माती हटवावी व जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. मुख्य रस्त्यांवर अशाप्रकारे मातीचे ढीगारे असणे हे चुकीचे असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांनादेखील त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिग नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com