

बायोलॉजी तंत्रज्ञानाचे
मुंबई विद्यापीठात प्रशिक्षण
मुंबई, ता. ११ : मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने आरटी-पीसीआर व प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी तंत्रज्ञानावरील दोन आठवड्यांचा ऑनजॉब ट्रेनिंग (ओजेटी) कार्यक्रम सुरू केला आहे. जीवविज्ञान शाखेतील विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्याच्या उद्देशाने हा चार क्रेडिटचा अल्पकालीन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमात आरटी-पीसीआर, मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, फ्लुरोसन्स इमेजिंग, ऑटोमेटेड लॅबोरेटरी सिस्टिम्स यांसारख्या अत्याधुनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. संशोधन संस्था, रुग्णालये, निदान प्रयोगशाळा आणि जैवतंत्रज्ञान कंपन्यांतील तंत्रज्ञानाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा कौशल्ये, संशोधन क्षमता आणि आधुनिक तांत्रिक ज्ञान प्रदान करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अनुभवाधारित शिक्षण, बहुविषयक अध्ययन आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आधुनिक शिक्षण हे केवळ सैद्धांतिक मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग आणि उद्योगसापेक्ष कौशल्ये देणारे असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रम क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
----
पहिली तुकडी १८ मेपासून
पहिली तुकडी १८ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्र, मुंबई विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन या केंद्राचे संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.