पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आशीष शेलारांचा कान्स दौरा रद्द

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आशीष शेलारांचा कान्स दौरा रद्द
Published on

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आशीष शेलारांचा कान्स दौरा रद्द
मुंबई, ता. ११ : देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी यंदाच्या फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय जाहीर केला. शेलार यांनी सांगितले की, ‘विभागीय खर्चांमध्ये संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अधिकाधिक बैठका व्हर्च्युअल माध्यमातून घेण्यात येणार असून, संसाधनांचा मर्यादित वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या मराठी चित्रपट तसेच त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय आणि सहकार्यासाठी संबंधित यंत्रणा नियोजित पद्धतीने कार्यरत राहतील, तसेच मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी जिथे आवश्यकता असेल, तिथे ऑनलाइन सहभागी होईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com