जव्हारमध्ये इंटरनेट सेवा खंडीत

जव्हारमध्ये इंटरनेट सेवा खंडीत
Published on

जव्हारमध्ये इंटरनेट सेवा खंडित

जव्हार, ता. ११(बातमीदार) : शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळित झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय कामे, बँक व्यवहार, शैक्षणिक प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज, महसूल विभागातील सेवा तसेच विविध कार्यालयीन कामांसाठी इंटरनेटची अत्यावश्यक गरज भासत असताना सेवा ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

जव्हार तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि व्यावसायिक आस्थापना बीएसएनएलच्या ब्रॉडबँड व वायफाय सेवांवर अवलंबून आहेत. खासगी मोबाईल नेटवर्क काही प्रमाणात सुरू असले तरी त्याचा वेग कमी असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. विशेषतः ऑनलाइन व्यवहार करणारे व्यापारी, बँक ग्राहक, विद्यार्थी आणि शासकीय सेवा घेणारे नागरिक यांना याचा मोठा फटका बसत आहे.

ग्रामीण भागातून विविध कामांसाठी शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही अनेकदा कामे अपूर्ण ठेवून परत जावे लागत आहे. इंटरनेट सेवा खंडित झाल्याने ई-सेवा केंद्रांचे कामकाजही मंदावले असून, स्थानिक अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन बीएसएनएलची इंटरनेट सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत जबरदस्त यांच्याकडे ही समस्या मांडण्यात आली असून त्यावर ही सुविधा पुरविणाऱ्या केंद्रांना सूचना दिल्या आहेत, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com