भिवंडीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

भिवंडीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
Published on

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने
पोलिस कर्मचारी निलंबित

भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) : आक्षेपार्ह मजकूर लिहून भावना दुखावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर भिवंडी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी निलंबनाची कारवाई केली. अंकुश रमेश सानप असे कारवाई करण्यात आलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोनगाव पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई अंकुश सानप याने ७ मे रोजी टेमघरगाव येथील गावदेवी यात्रेच्या दरम्यान पुजारी पारंपरिक पद्धतीने पूजा करीत असतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवून त्याखाली समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असा मजकूर लिहिला होता. याबाबत स्थानिक नगरसेवक रोहित चौधरी यांनी सानप यांना विचारणा केली असता त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरून उद्धटपणाचे वर्तन केले. याबाबत चौधरी यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com